गरज आरोग्यविषयक नीर क्षीर विवेकाची

Ayurved For Public Health   2019-05-03

      गरज आरोग्यविषयक नीर क्षीर विवेकाची

                           ' केवळ १५ दिवसांमध्ये २० किलो वजन कमी करा … अ ब क ड  या ४  औषधांचे मिश्रण घ्या आणि मधुमेहापासून मुक्त व्हा... ' केवळ एका व्हॉटसप मेसेज मध्ये जाणून घ्या संपूर्ण आयुर्वेद ... ' हिमालयातील जडीबुटी घ्या आणि सर्व दुर्धर आजारातून मुक्त व्हा '... अशा प्रकारच्या अनेक मेसेज, फोटोंनी सध्या टीव्हीवरील बातम्या, प्रायोजित कार्यक्रम, तसेच फेसबुक,  व्हॉटसप इ.  सोशल मीडिया यामध्ये  धुमाकूळ घातला आहे . क्वचित प्रसंगी यामधील काही दावे, उपाय कदाचित खरे असतीलही मात्र बहुतांश वेळा एखाद्या रोगाचा बागुलबुवा करून तर कधी विविध ऍनिमेशन, अन्य माध्यमे याद्वारे प्रेक्षकांनां, वाचकांना भुलवून बऱ्याचदा  विविध प्रलोभनांना बळी पाडले जाते. आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक बदल न करता, खाण्यापिण्याचे वा व्यायामाचे निर्बंध न पाळता विनासायास आरोग्यप्राप्तीच्या या जाहिरातींच्या आणि माहितीच्या मायाजाळामध्ये बऱ्याचदा अनेकजण अडकताना दिसतात. आणि या सर्व प्रकारांमुळे  शारीरिक व आर्थिक नुकसानाबरोबरच मनस्तापालाही अनेकांना सामोरे जावे लागते. आज समाजाचे आरोग्यभान जपताना, आरोग्यविषयक जागृती करताना अशा प्रकाराच्या प्रलोभनांकडे देखील सर्वाना डोळसपणे पाहता यावे यासाठी हा लेखनप्रपंच .

       à¤†à¤œà¤šà¥‡ युग हे स्पर्धेचे आहे .  विविध सौंदर्यप्रसाधने, डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय मिळू शकतील अशी औषधे¸ शरीराची तंदुरुस्ती राखण्यासाठी उपयुक्त असे आहारीय पदार्थ , घरच्या घरी करता येईल अशा प्रकारच्या  व्यायामाची उपकरणे किंवा साधने , योगाभ्यासासाठी  उपयुक्त साधने तसेच मार्गदर्शक पुस्तिका व अन्य साहित्य यांच्या निर्मितीक्षेत्रामध्ये जागतिक स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत अनेक कंपन्या आरोग्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. जगाच्या एक षष्ठांश लोकसंख्या असलेला आपला भारत देश ही जगातील एक प्रमुख बाजारपेठ असून यामधील आपला हिस्सा अधिकाधिक वाढवण्यासाठी देशी विदेशी सर्वच उद्योजकांमध्ये नेहमीच तीव्र स्पर्धा सुरु असते. अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आरोग्यविषयक विविध जाहिराती, प्रायोजित कार्यक्रम आणि सोशल मीडिया अत्यंत महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. समाजमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून  साधारणतः सर्वसामान्यांचा कल कशाप्रकारच्या उत्पादनांकडे आहे, बाजारपेठेची काय मागणी आहे याचे गृहीतक मांडून ही विविध उत्पादने समाजात आपला जम बसविण्याचा प्रयत्न करतात. यामधील अनेक उत्पादने ही सर्व नियमांचे काटेकोर पालन करून योग्य प्रकारे स्पर्धेत उतरतात तर काही कंपन्या वाममार्गांचा वापर करून  जनतेस भुलविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे केवळ जाहिरातींमधील दाव्यांना बळी न पडता विविध कसोट्यांवर पडताळलेली तसेच निर्धोक उत्पादनांचे सर्व निकष पूर्ण करणारी उत्पादने निवडणे आवश्यक आहे.

       à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤¯à¤¨à¤¿à¤• औषधे, खते यांच्या बेसुमार किंवा अनियंत्रित वापरामुळे आणि त्याचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने  आज सर्व जग सेंद्रिय व हर्बल उत्पादनांकडे वळताना दिसत आहे. मात्र हर्बल उत्पादने निवडताना प्रत्येक हर्बल उत्पादन आयुर्वेदिकच असेल  किंवा केमिकल विरहित असेल अशी खात्री देता येत नाही. विशेषतः सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रात  हर्बल च्या मुलाम्याखाली अनेकदा रासायनिक पदार्थांच्या वापराचा धोका संभवतो. तेव्हा सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत सर्वांनीं ही काळजी घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर टीव्ही , युट्युब वा अन्य माध्यमांतील  जाहिरातींमध्ये , प्रायोजित कार्यक्रमांमध्ये तसेच व्हॉटसअप वा अन्य माध्यमांवर आजकाल आयुर्वेदाचा खूप बोलबाला आहे. अनेक दुर्धर रोगांवर खात्रीशीर उपायांचा दावा यामध्ये केला जातो. एक भारतीय शास्त्र म्हणून आयुर्वेदाचा हा प्रसार नक्कीच सुखावह असला तरीही यामध्ये सुचविलेले उपाय , सांगितलेली औषधे वापरण्यापूर्वी आपल्या जवळच्या आयुर्वेद तज्ञाशी सल्लामसलत करणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेद शास्त्र हे व्यक्तिसापेक्ष विचार करणारे आहे. प्रत्येक व्यक्तीची  प्रकृती¸à¤µà¤¯¸ अग्नी अर्थात पचनशक्ती¸ शरीराचे बळ व मनोधैर्य¸ दैनंदिन जीवनशैली¸ खाण्यापिण्याच्या सवयी तसेच  आजाराचे स्वरूप, त्या आजाराची सुरुवात¸ पूर्व इतिहास अशा विविध घटकांचा विचार करून रोगाचे निदान केले जाते. तसेच या निदानानुसार शरीराच्या गरजेनुसार औषधाची योजना केली जाते. आयुर्वेदातील हे बहुतांश नियम व मूलभूत संकल्पना या योग शास्त्रास देखील लागू पडतात.  बाजारातील विविध आयुर्वेदिक उत्पादने वापरताना  तसेच व्यायाम प्रकार व आसन - प्राणायामाचा तज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय उपयोग करताना प्रत्येकाने या गोष्टीचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे . अन्यथा व्यक्तीच्या आरोग्याची हानी आणि पर्यायाने या प्राचीन भारतीय वैद्यक शास्त्राची बदनामी होण्याचा धोका संभवतो.

         à¤†à¤œ इंटरनेट वा अन्य माध्यमातून माहितीचे अक्षरशः मायाजाल आपल्या भोवती आहे. यामध्ये जशा काही अपप्रवृत्ती आहेत तसेच  आरोग्यविषयक जागृतीचे कार्य  करणाऱ्या  देखील अनेक व्यक्ती व संस्था देखील आहेत. अशा सकात्मक योगदान देणाऱ्या आरोग्य विषयक चळवळींसाठी टीव्हीवरील कार्यक्रम तसेच सोशल मीडियामधील व्यासपीठ हे एक उत्तम साधनच आहे. गरज आहे ती यांचा योग्य प्रकारे वापर होण्याची.

       à¤†à¤œà¤•à¤¾à¤² विशेषतः शहरी भागात दवाखान्यामध्ये येणारे बरेचसे रुग्ण हे आपल्याला होणारी लक्षणे गुगल महाराजांना सांगून त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती घेऊनच डॉक्टरांकडे येतात. आपले निदान तसेच उपचार याविषयी अशा रुग्णाचे काही समज - गैरसमज गुगल महाराजांच्या कृपेने दृढ झालेले असतात. यातून अनेकदा डॉकटर व पेशंटमध्ये मतभेद होताना दिसतात. ' श्रद्धावान लभते ज्ञानं ' या उक्ती प्रमाणेच 'श्रद्धावान लभते गुणम' असा भाव ठेवत आपल्या उपचारपद्धतीवर डोळस श्रद्धा देखील असणे रुग्णास उपचारांचा योग्य लाभ होण्यासाठी आवश्यक आहे.

                         नियंत्रित व हितकर आहार घेणे ¸ मोकळ्या हवेमध्ये  दररोज चालणे ¸ सूर्यनमस्कार अथवा अन्य व्यायाम करणे  ¸ आयुर्वेदानुसार दिनचर्या तसेच निसर्गातील ऋतुचक्रामध्ये होणाऱ्या बदलानुसार दैनंदिन उपक्रमामध्ये आवश्यक ते बदल करणे    मनःशांतीसाठी अध्यात्म¸ प्राणायाम व योगाभ्यास याचबरोबर आपले कुटुंबीय¸ जीवलग नातेवाईक¸ ऑफिसमधील सहकारी यांच्याशी सुसंवाद¸ मोकळेपणाने बोलणे हे सर्व निरोगी व सुखकर आयुष्याचे मंत्र आहेत. यांचा अवलंब केल्यास आरोग्यक्षेत्रातील प्रलोभनांना बळी पडण्याची वेळ आपल्यावर येणार नाही व पर्यायाने अवास्तव जाहिरातबाजी वा अन्य प्रलोभनांपासून दूर राहून आयुर्वेदाला अपेक्षित असे शरीर व मनाचे संपूर्ण स्वास्थ्य मिळेल याची खात्री आहे. म्हणूनच आरोग्यभान जपत आरोग्यविषयक जागरूकता वाढविताना या क्षेत्रामध्ये घुसलेल्या काही अपप्रवृत्तींपासून आपले रक्षण करण्यासाठी गरज आहे ती आरोग्यविषयक नीर - क्षीर विवेकाची ...

         à¤µà¥ˆà¤¦à¥à¤¯ सौ. नेहा नचिकेत वाचासुंदर

पंचवेद आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल , कराड । पुणे .